ढेबेवाडी (जिल्हा सातारा) येथे विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी

रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यातील ४ जणांचे अहवाल कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आले.

संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ जाहीर !

प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ जाहीर करण्यात आला आहे.

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात ‘कोविड केअर सेंटर’ला प्रारंभ !

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित मैंदर्गी रस्त्यावरील ‘श्री स्वामी समर्थ रुग्णालया’त ‘कोविड केअर सेंटर’ला प्रारंभ करण्यात आला.

पुणे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी १० पथके तयार !

रेमडेसिविर इंजेक्शनची जादा दराने विक्री करणार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यासमवेतच त्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !

पुण्यातील उद्योजकाच्या सहकार्याने सिंगापूरमधून ८ सहस्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ३ सहस्र ५०० व्हेन्टिलेटर भारतात आणणार !

आरोग्यव्यवस्था अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्व उद्योजकांचे अभिनंदन ! सद्यस्थितीत सिंगापूर येथून आणलेल्या आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोचण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे.

जिल्हाबंदीची कार्यवाही कठोरपणे करा ! – शंभूराज देसाई

जिल्हाबंदीच्या कार्यवाहीविषयी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेेवरील सारोळा तपासणी नाक्याला भेट देऊन पहाणी केली.

पुण्यातील रुग्णालयांनी फायर सेफ्टी ऑडिट करून घेण्याचा अग्नीशमनदलाचा आदेश !

कोविड रुग्णालयांमध्ये अपघात झाल्यावर लेखापरीक्षणाचा आदेश देण्याऐवजी त्यासाठी कायमस्वरूपी कार्यपद्धत हवी !

रेमडेसिविर इंजेक्शनची २२ सहस्र रुपयांना विक्री करणार्‍या ३ जणांना अटक !

बीड येथे रेमडेसिविर इंजेक्शन २२ सहस्र रुपयांना विक्री केल्याच्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ३ जणांना कह्यात घेतले आहे.

सातारा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी !

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा येेेथील भरारी पथकाने वाई तालुक्यात धाडी टाकून अवैधरित्या मद्यविक्रीच्या बाटल्या आणि २ चारचाकी वाहने, असा २ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

‘मिशन वायू’या उपक्रमाअंतर्गत ‘पी.पी.सी.आर्.’ देणार २५० व्हेंटिलेटर !

‘मिशन वायू’ उपक्रमांतर्गत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससारखी क्रिटिकल केअर उपकरणे सरकारी आणि खासगी रुग्णालयांना विनामूल्य दिली जाणार आहेत.