हरिद्वार, २५ एप्रिल (वार्ता.) – सत्संगातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणे आवश्यक आहे. सर्वांना धर्मशिक्षण देऊन हिंदु राष्ट्रासाठी एक प्रस्ताव सिद्ध करून प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे त्याचा ठराव संमत करायला हवा आणि तो सरकारला पाठवला पाहिजे. मुसलमानांना हज यात्रेसाठी निधी दिला जातो; मात्र हिंदूंच्या यात्रांवर कर लावला जातो, हे योग्य नाही. ते टाळण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राविषयी आंदोेलने करण्यासह सत्संग आणि कीर्तने यांद्वारेही जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. मी हिंदु जनजागृती समितीचे कार्य जवळून पाहिले असून तुमचे ऑनलाईन सत्संगही पहात असतो. ते सत्संग पुष्कळ चांगले असून मन प्रसन्न होते. तुमचे ‘सनातन पंचांग’ अॅप स्वत: डाऊनलोड करून अन्य संतांनाही मी डाऊनलोड करण्यासाठी सांगतो, असे प्रतिपादन श्री नीलमणिदास महाराज यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री नीलमणिदास महाराज यांची भेट घेतली असता ते बोलत होते.