औषधोपचार न केल्यानेे संतप्त कोरोनाबाधित पतीकडून पत्नीची हत्या !

करंजाडे (पनवेल) – येथील कोरोनाबाधित पतीला पत्नीने घरातील सज्जामध्ये (गॅलरीमध्ये) ३-४ दिवस ठेवले होते. तिने पतीला औषधोपचारांसाठी आधुनिक वैद्यांकडे नेले नव्हते. याचा राग अनावर होऊन त्याने २४ एप्रिल या दिवशी तिच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिची हत्या केली. या प्रकरणी पतीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्याला उपचारांसाठी कोविड केंद्रात भरती केले आहे.