संभाजीनगर येथे वर्गोन्नतीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या शाळांवर कारवाई करण्याचा प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांचा आदेश !

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते नववी आणि अकरावी पर्यंतच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचे आदेश शाळांना दिले आहेत; मात्र या आदेशाला न जुमानता बहुतांश इंग्रजी शाळांनी सर्रासपणे परीक्षा घेण्यास प्रारंभ केला.

विश्‍व हिंदु परिषद बजरंग दलाच्या पनवेल प्रखंडच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४२ युवकांनी केले रक्तदान

विश्‍व हिंदु परिषदेच्या कोकण प्रांतात महारक्तदान शिबिरांचे आयोजन

नखांसाठी गर्भवती वाघिणीला शिकार्‍यांनी जिवंत जाळले !

येथील पांढरकवडा तालुक्यात २६ एप्रिल या दिवशी सकाळी गर्भवती वाघिणीची तिच्या नखांसाठी शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या वाघिणीच्या समोरील पायांचे पंजे शिकार्‍यांनी कापून नेले आहेत.

कर्नाटकमध्ये आजपासून १४ दिवसांची दळणवळण बंदी

कर्नाटक सरकारन उद्यापासून म्हणजे २७ एप्रिलपासून १४ दिवसांची दळणवळण बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. दुकाने सकाळी ६ ते १० पर्यंत चालू असतील. बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्र यांना अनुमती आहे.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी ५ वाहनांची जाळपोळ करत कापडी फलक लावले !

मागील १ मासापासून परिसरात ‘पंतप्रधान ग्रामसडक योजने’च्या अंतर्गत मेडपल्ली ते तुमीरकसा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम चालू होते. त्यामुळे कामावर असलेली वाहने मेडपल्ली या गावात ठेवण्यात आली होती. याच वाहनांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले आणि सर्व वाहने पेटवली.

नालासोपारा येथे कुत्रींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

२२ वर्षीय विकृत धर्मांध युवकाने २ कुत्रींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले आहे. इरफान बागवान असे त्याचे नावे आहे.

कोल्हापुरातील एका केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी

कोल्हापुरात दोन दिवसांच्या लसीच्या तुटवड्यानंतर २६ एप्रिल या दिवशी अनेक केंद्रांवर प्रचंड प्रमाणात गर्दी उसळल्याचे दिसून आले. या वेळी सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

‘शाब्बास मुंबईकर’ म्हणण्याची वेळ लवकरच येईल ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबलेला नसला, तरी संख्या वाढू नये, यासाठी मुंबईकर कटिबद्ध असल्याचे दिसत आहे. बहुतांश मुंबईकर घरात बसून आहेत. हे चित्र कायम राहिल्यास ‘शाब्बास मुंबईकर’, असे म्हणण्याची वेळ लवकरच येईल’, असा विश्‍वास मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार, तर सांगली शहर येथे पावसाने नागरिकांना दिलासा !

कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, नेसरी, गडहिंग्लज, गारगोटी भागांत वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला.

कर्तव्यावर उपस्थित रहाण्यास विचारल्याने वाहतूक पोलिसानेच केली हवालदाराला मारहाण !

 कर्तव्यात कुचराई करणारे आणि जाब विचारल्यावर मारहाण करणारे असे पोलीस कायदा-सुव्यवस्था काय राखणार ?