वाघिणीचे पायांचे पंजे कापले !
असे क्रौर्य करणार्यांना तात्काळ कठोर शासन व्हायला हवे !
यवतमाळ – येथील पांढरकवडा तालुक्यात २६ एप्रिल या दिवशी सकाळी गर्भवती वाघिणीची तिच्या नखांसाठी शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या वाघिणीच्या समोरील पायांचे पंजे शिकार्यांनी कापून नेले आहेत. येथील एका लहानशा गुहेत वाघीण रहात होती. तिला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी शिकार्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. वाघीण मेली आहे कि नाही, याची निश्चिती करण्यासाठी तिच्या शरिरावर तीक्ष्ण हत्यारांनी जखमा केल्या. ती मेल्याची निश्चिती झाल्यावर तिचे पंजे कापून नेले.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण