तिसरे महायुद्ध झाले, तर अणूबाँबचा वापर होईल ! – रशिया

युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्‍चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे डागणार्‍या दलास सिद्ध रहाण्याचा आदेश दिलेला आहे.

रशियाकडून युक्रेनच्या सैन्यतळावर झालेल्या आक्रमणात ७० सैनिक ठार

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील सैन्यतळावर मोठे आक्रमण केले. यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत.

युक्रेनमधील रुग्णालयांत प्राणवायुचा (ऑक्सीजनचा) मोठा तुटवडा

या तुटवड्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली असून ‘जर युक्रेनमधील रुग्णालयांत त्वरित प्राणवायु उपलब्ध करून दिला नाही, तर मोठा अनर्थ घडू शकतो’, अशी भीती व्यक्त केली आहे.

खारकीवमध्ये रशियाच्या आक्रमणात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

भारताने युक्रेन आणि रशिया यांच्या भारतातील राजदूतांना विचारला जाब

‘युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्च’कडून रशियाच्या आक्रमणाला विरोध !

युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चने वर्ष २०१९ मध्ये रशियन ऑर्थोडॉक्स चर्चपासून विभक्त होऊन स्वतःला मुक्त केले होते. आता युक्रेनच्या चर्चला अमेरिकेसह इतर पाश्‍चात्त्य देशांकडून आर्थिक आणि इतर साहाय्य मिळते. हे रशियाला मान्य नाही.

रशियाकडून युक्रेनच्या सैन्यतळावर झालेल्या आक्रमणात ७० सैनिक ठार

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी युद्धाने अत्यंत भीषण रूप धारण केले आहे. रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील  सैन्यतळावर मोठे आक्रमण केले.

तात्काळ कीव सोडा ! – दूतावासाकडून भारतियांना सूचना

रशियाचे सैन्य वेगाने कीवकडे आगेकूच करत असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे.

रशियाच्या विरोधात युक्रेन जागतिक सैन्य बनवणार !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी रशियाच्या विरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्य बनवण्याची घोषणा केली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला अनेक विदेशी नागरिकांचे अर्ज प्राप्त होत आहेत.

रशियाच्या आक्रमणात जगातील सर्वांत मोठे मालवाहू विमान जळून खाक !

या विमानाने सप्टेंबर २००१ मध्ये ४ रणगाडे घेऊन आकाशात उड्डाण केले होते. त्यांचे एकूण वजन तब्बल २५३ टन इतके होते. एखाद्या विमानाने सर्वाधिक वजन वाहून नेण्याचा हा आतापर्यंतचा जागतिक विक्रम आहे.

युक्रेनला शस्त्रखरेदीसाठी युरोपीयन महासंघ साहाय्य करणार !

शत्रूचे आक्रमण झेलणार्‍या कोणत्याही देशाला संयुक्त महासंघाने अशा प्रकारचे साहाय्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.