केंद्र सरकारकडून जनतेसाठी संदेश या अ‍ॅपची निर्मिती व्हॉट्सअ‍ॅपला भारतीय पर्याय

व्हॉट्सअ‍ॅपकडून गोपनीयतेविषयी नवीन धोरण लागू केल्याने अनेकांनी त्याचा विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने संदेश हे व्हॉट्सअ‍ॅप सारखे काम करणारे नवीन अ‍ॅप जनतेसाठी आणले आहे.

मागील ४ वर्षांपासून स्ट्रेचरवर असलेले डॉ. होमकर यांना लाभले श्रीविठ्ठलाचे दर्शन

मागील ४ वर्षांपासून स्ट्रेचरवर असलेले सोलापूर येथील श्रीविठ्ठलभक्त डॉ. राजाराम होमकर यांची श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. डॉ. होमकर यांची श्रीविठ्ठल दर्शनाची पुष्कळ दिवसांपासून इच्छा होती.

श्री स्वामी समर्थ भक्तांना आता विनामूल्य ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग करता येणार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादासाठी येणार्‍या सर्व स्वामी भक्तांना विनामूल्य ऑनलाईन महाप्रसार बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजपच्या वतीने नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांचे सांगली महापौरपदासाठी आवेदन 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौरपदासाठी नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदी गजानन मगदूम यांनी प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत आडके यांच्याकडे आवेदन प्रविष्ट केले.

अकोला जिल्ह्यात गोवंशियांची चोरी करणार्‍या ६ धर्मांधांना अटक

गोवंशियांची हत्या आणि त्यांची चोरी करण्याविषयी कठोर कायद्याची कठोरपणाने कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध सतत असे गुन्हे करतच आहेत !

मुंबई येथे वाहतूक पोलिसाला मारहाण, ४ तृतीयपंथियांना अटक

वाहतुकीचे नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस हवालदार विनोद सोनवणे यांच्यावर ४ तृतीयपंथियांनी आक्रमण केल्याचा प्रकार १६ फेब्रुवारी या दिवशी येथील छेडानगर जंक्शन परिसरात घडला आहे.

ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्गाकरिता सिडको भूमी देेणार

या रेल्वे मार्गामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा भार न्यून होण्यास साहाय्य होणार आहे,

इतर प्रभागांत गेलेली नावे परत समाविष्ट न केल्यास आंदोलन करू ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

शिवसेनेचा महापौर होऊ नये, म्हणून त्यांच्या हक्काचे ६०० ते १ सहस्र मतदार दुसर्‍या मतदारसंघात टाकायचे आणि या ठिकाणी विरोधकांचे मतदार घुसवायचे, असे षड्यंत्र चालू आहे.

पेट्रोल आणि डिझेल वाढीवर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे मौन का ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग शासनाच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्वीटरच्या माध्यमातून डिझेल-पेट्रोल तेलांच्या वाढत्या किमतींवर बोलत होते; मात्र आता त्यांनी यावर मौन बाळगले आहे.

राज्यातील २८ जिल्ह्यांना अवेळी पावसाची चेतावणी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांवर अवकाळीचे सावट !

राज्यातील २८ जिल्ह्यांना गारपीट आणि पाऊस पडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी नागपूर शहर, भंडारा, बाळापूर (जिल्हा अकोला), खामगाव (जिल्हा बुलडाणा) परिसरात हलका पाऊस झाला.