अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – सध्या कोरोना महामारी चालू आहे, तसेच स्वामी भक्तांची गर्दीही वाढत चालली आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादासाठी येणार्या सर्व स्वामी भक्तांना विनामूल्य ऑनलाईन महाप्रसार बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली. ही व्यवस्था विनामूल्य असून त्याचा लाभ सर्व स्वामी भक्त घेऊ शकणार आहेत.
याविषयी अमोलराजे भोसले यांनी सांगितले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात वर्ष १९८८ पासून अक्कलकोट येथे येणार्या सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाची सोय केली जाते. दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक पंगतीच्या काही जागा ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग करणार्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय न्यासाने घेतला. यामुळे स्वामी भक्तांचा वेळ वाचेल.
|