नवी देहली – व्हॉट्सअॅपकडून गोपनीयतेविषयी नवीन धोरण लागू केल्याने अनेकांनी त्याचा विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संदेश हे व्हॉट्सअॅप सारखे काम करणारे नवीन अॅप जनतेसाठी आणले आहे. प्ले स्टाएरवरून ते डाऊनलोड करता येऊ शकते. प्रारंभी याचा वापर सरकारी कर्मचारी करत होते. त्यांच्याकडून यांचा योग्यरित्या वापर होत असल्याचे लक्षात आल्यावर जनतेसाठी हे अॅप खुले करण्यात आले आहे. हे अॅप नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरने विकसित केले आहे. हे सेंटर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित आहे.