|
|
अकोला – स्थानिक गुन्हे शाखेने १८ फेब्रुवारी या दिवशी गोवंशियांची चोरी करणार्या टोळीतील ६ धर्मांधांना येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ गोवंशियांच्या चोरीचे गुन्हे उघड केले आहेत. या प्रकरणातील ६ धर्मांधांना अटक केली, तरी यातील २ आरोपी पसार आहेत. गोवंशियांची चोरी प्रकरणात वापरलेल्या १४ लाख रुपयांच्या चारचाकी आणि गोवंश विकलेले २ लाख ५२ सहस्र ९०० रुपये पोलिसांनी जप्त केले. (गोवंशियांना पोसणारे पोलीस प्रशासन काय कामाचे ? २२ गुन्हे होईपर्यंत ते न पकडणारे पोलीस निष्क्रीय कि भ्रष्ट ?- संपादक)
जिल्ह्यात वर्षभरात गोवंशियांच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. या प्रकरणी स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांना दायित्व दिले. यामध्ये गुप्त माहितीच्या आधारवर त्यांनी गोवंश चोरी करणारे धर्मांध शेख शकील शेख जलील, मोहम्मद फहीम मोहम्मद जमिल यांना कह्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी शेख सोहेल शेख युसूफ, मोहम्मद मुजीब उर्फ मज्जू लंगडा मोहम्मद सलिम, शोएब बेग अजहर बेग, शेख रेहान शेख युसुफ कुरेशी, शेख सलमान शेख आमद कुरेशी, अज्जू अशी आरोपींनी नावे सांगून त्यांनी २३ गुन्हे केल्याचे सांगितले.
पोलिसांनी या ६ धर्मांधांना अटक केली. या प्रकरणातील अजमत शहा रहमत शहा आणि अब्बासी जाफरी अफजल हुसैन हे धर्मांध पसार आहेत. जिल्ह्यातील पातूर येथे ५, बाळापूर ४, सिव्हिल लाईन येथे ३, अकोट फाईल २, बार्शी टाकळी २, मूर्तिजापूर ग्रामीण आणि डाबकी रोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी २, सिटी कोतवाली आणि उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी १ गुन्हे, असे या धर्मांधांनी २२ गुन्हे मान्य केले आहेत.