जनतेच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाविकास आघाडी ही जनतेच्या विश्‍वासाच्या बळावर स्थापन झाली आहे. कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्र घाबरला नाही आणि घाबरणार नाही. जनतेच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

उत्तरप्रदेशात आता ८ वीपर्यंतचे विद्यार्थी आठवड्यातून एकदा दप्तराविना जाणार !

तरुण पिढीला खर्‍या अर्थाने तणावमुक्त करण्यासाठी तिच्यावर साधनेचा संस्कार करून ती करवून घेणे आवश्यक आहे.

३१ डिसेंबर २०१९ पर्यंत राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील प्रविष्ट केलेले खटले मागे घेणार ! – शासनाचा निर्णय

राज्यातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनाच्या वेळी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रविष्ट करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने २ डिसेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला.

ठाणे महानगरपालिकेतील स्थावर मालमत्ता विभागातील लाचखोर लिपीक कह्यात

तक्रारदार दलालाने मानपाडा येथील ‘दोस्ती इम्पेरियर’ या गृहसंकुलातील सदनिका बारमध्ये काम करणार्‍या मुलीला घेऊन दिली होती. त्याच्यावर नियमानुसार कारवाई न करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतील स्थावर मालमत्ता विभागातील लिपीक हेमंत गायकवाड (वय ३३ वर्षे) यांनी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली.

कोरोनाच्या संभाव्य लसीकरणाच्या कार्यवाहीसाठी जिल्हा कृती दलाची स्थापना

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी बाजारात येणार असलेल्या संभाव्य लसीकरणाच्या कार्यवाहीसाठी राज्य सरकारने २ डिसेंबर या दिवशी जिल्हानिहाय जिल्हा कृती दलाची स्थापना केली आहे.

सिडको पुनर्प्रक्रियायुक्त सांडपाणी तळोजा औद्योगिक क्षेत्राला पुरवणार

जगभर पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात असतांना सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिडकोच्या वतीने करण्यात येणारे प्रयत्न हे पाणी बचत आणि पर्यावरण यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहेत.

पोलीस दलात परीक्षेसाठी बनावट उमेदवार देणार्‍या सूत्रधारास अटक 

कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलामध्ये हवालदार आणि आय.आर्.बी. नेमणुकीसाठी २२ नोव्हेंबर या दिवशी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बनावट उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

भूसंपादन केल्यास भरपाईचे उत्तरदायित्व सरकारवर

सरकार भूसंपादन करत असेल तर भूमीमालकांना कायदेशीरदृष्ट्या योग्य भरपाई देणे हे नैतिकदृष्ट्या बंधनकारक असलेले उत्तरदायित्व सरकारवर येते.

गर्दीच्या वेळीही अधिवक्त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा विचार करा ! – न्यायालय

दळणवळण बंदीनंतर आठ मासांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला प्रारंभ झाला.

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयाकडे अर्ज

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने ४ डिसेंबर या दिवशी विशेष ‘पीएम्एलए’ न्यायालयाकडे केली आहे. त्यांची संपत्तीही कह्यात घेण्याची अनुमती अंमलबजावणी संचालनालयाने मागितली आहे.