जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जाणार ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

या वेळी प्रथितयश अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.

मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त !

येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २८ सप्टेंबर या दिवशी मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी ५ कोटी रुपयांचे ४९० ग्रॅम कोकेन जप्त केले.

खासगी महाविद्यालयाने शुल्क न्यून करावे, आम्ही (सरकार) प्राध्यापकांचे वेतन देतो ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

राज्यातील खासगी महाविद्यालय जास्त शुल्क आकारत असल्याने शिक्षण महाग झाले आहे. प्राध्यापकांचे वेतन या शुल्कातून करत असल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे; मात्र सरकार खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाचे दायित्व घेईल; पण त्यांनी शुल्क अल्प आकारावे,

‘लोन ॲप’ फसवणूक प्रकरणी ९ जण कह्यात !

महिलेला ‘लोन ॲप’ डाऊनलोड करायला सांगून मागणी केली नसतांनाही कर्ज संमत करून त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी धमकावून १ लाख ११ सहस्र रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी बेंगळुरू येथून ९ जणांना कह्यात घेतले आहे.

‘महिलांची सद्यःस्थिती आणि स्वसंरक्षणाची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांचे व्याख्यान !

सेलू (परभणी) येथे ‘श्री रामबाग गणेशोत्सव मंडळा’चा उपक्रम !

सातारा येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण’ !

येथील कोरेगाव रस्त्यावरील वेदभवन मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने अचानक येणार्‍या हृदयविकार झटक्यावर प्राथमिक उपचार देण्यासाठी ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

आजपासून दुकानांवरील नामफलक मराठीत नसल्यास कारवाई ?

मराठी भाषेत फलक लावण्याचे काम काही दिवसांचे असतांना वारंवार त्यासाठी मुदत वाढवून घेणे आणि शेवटी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणे हा उद्दामपणा तर नव्हे ना ?

‘पुणे महानगर परिवहन’ला प्रतिदिन १ कोटी ५० लाख रुपये ठेकेदारांना द्यावे लागतात !

पी.एम्.पी.ला (‘पुणे महानगर परिवहन’ला) प्रतिदिन १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यातील ९० लाख रुपये हे ठेकेदारांच्या बसमधून मिळतात; पण ठेकेदारांच्या ८५० बसगाड्यांसाठी पी.एम्.पी.लाच १ कोटी ५० लाख रुपये भाडे द्यावे लागते.

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (कोल्हापूर) येथे झालेल्या आंदोलनात १०० धर्मप्रेमी उपस्थित !

आंदोलनात सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद धनवडे यांनी केले, तर श्री. आदित्य शास्त्री यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.

अमरावती महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या धर्मांध प्रभारी अधीक्षकांना लाचखोरीप्रकरणी अटक !

महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक सय्यद अन्वर सैय्यद अकबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.