उत्पन्नाअभावी पी.एम्.पी. वर्षाचा संचित तोटा ७१० कोटी रुपये
पुणे – पी.एम्.पी.ला (‘पुणे महानगर परिवहन’ला) प्रतिदिन १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यातील ९० लाख रुपये हे ठेकेदारांच्या बसमधून मिळतात; पण ठेकेदारांच्या ८५० बसगाड्यांसाठी पी.एम्.पी.लाच १ कोटी ५० लाख रुपये भाडे द्यावे लागते. सर्व उत्पन्न ठेकेदारांनाच द्यावे लागत असल्याने पी.एम्.पी. वर्षाचा संचित तोटा ७१० कोटी रुपये झाला आहे. सध्या आवश्यक नसतांनाही ३०० नव्या ई-बस भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रति कि.मी. ७० रुपये दर आकारला जाणार आहे. नव्या बसगाडीचे मूल्य १ कोटी रुपये असून महानगरपालिका ३५ लाख रुपये आणि ठेकेदार ६५ लाख रुपये भरणार आहेत; मात्र त्यावर मालकी ठेकेदारांचीच असेल. बसखरेदीमध्ये राजकीय दबाव असल्याचीही चर्चा आहे.