पश्‍चिम महाराष्ट्रात १ सहस्र ८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोर्‍या उघडकीस

वीजचोरी करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे प्रादेशिक विभागात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

बाजारातील ५० टक्के खाद्यतेल भेसळयुक्त !

खाद्यतेलात सध्या मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार व्यापक स्वरूपात ३० अन्न सुरक्षा अधिकारी यांचा समावेश असलेल्या या पथकाने बोरिवली, गोरेगाव, वाशी, मीरारोड, वसई, भिवंडी, पालघर अशा ठिकाणी तेल विक्री करणार्‍या आस्थापनांवर धाडी टाकल्या.

मुलांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी चौघांवर कारवाई

अशा प्रकारे हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना बडतर्फ केल्यासच इतरांना जरब बसेल !

शिवाजी महाराज यांचे पूर्वज कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे ! – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे कर्नाटक येथील असल्याचे विधान चुकीचे आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. ‘असे विधान करून थोर पुरुषांच्या संदर्भात वाद निर्माण करू नये.

(म्हणे) ‘भाजपवाले श्रीराममंदिराच्या देणग्या गोळा करून त्या पैशांतून रात्री मद्यपान करतात !’ – काँग्रेसच्या आमदाराचा आरोप

तोंड आहे म्हणून बरळणारे काँग्रेसचे आमदार ! देशात सर्वाधिक काळ सत्तेत असणार्‍या काँग्रेसवाल्यांनी देशाच्या विकासाचा किती निधी हडपला, हे जगाला ठाऊक आहे !

कोरोनाच्या संकटामुळे बुलढाणा येथील विवेकानंद जन्मोत्सव रहित !

विदर्भातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे ‘विवेकानंद जन्मोत्सव’ हा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे प्रतीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा उत्सव रहित करण्यात आला आहे.

नागपूर येथे लंडनमधील कथित मैत्रिणीकडून वृद्ध व्यक्तीस १० लाख रुपयांचा गंडा !

लंडन येथील एक कथित लिडा थॉमसन या मैत्रिणीने येथील एका ६६ वर्षीय सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. ‘कस्टम ड्युटी’च्या नावाखाली वृद्धाचे १० लाख रुपये ही मैत्रीण आणि तिची टोळी यांनी पळवली.

मुख्य आरोपी बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाने बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आता पोलिसांना शरण येणे किंवा सर्वोच्च न्यायायात धाव घेणे हे २ पर्याय आरोपीसमोर असू शकतात.

नांदेड येथे वन विभाग आणि मनरेगा यांच्या कामात बनावट कामगार दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !

जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील चिदगिरी ग्रामपंचायतीमध्ये वनविभागाच्या मनरेगा आणि सामाजिक वनीकरण यांच्या विविध कामांत बनावट कामगार दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

पहिल्याच दिवशी मास्क न घालणार्‍या लोकलच्या ५१५ प्रवाशांवर कारवाई

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास अनुमती दिल्यानंतर पहिल्याच दिवशी मास्क न घालणार्‍या लोकलच्या ५१५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ३९६ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करतांना पकडण्यात आले आहे.