अशा प्रकारे हलगर्जीपणा करणार्या कर्मचार्यांना बडतर्फ केल्यासच इतरांना जरब बसेल !
यवतमाळ – येथे १२ बालकांना ‘पोलिओ लसी’ऐवजी सॅनिटायझर पाजल्याच्या प्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. येथील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणाच्या वेळी भ्रमणभाषवर बोलतांना ही चूक झाल्याचे समजते. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम आणि महेश मनवर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे आणि आशा कार्यकर्त्या संगीता मसराम यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कलिंदा पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जाऊन पालकांना भेटून बालकांच्या आरोग्याची चौकशी केली. १ ते ५ वयोगटातील ही मुले असून सर्वांची प्रकृती आता ठीक आहे.