मुख्य आरोपी बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

रेखा जरे हत्या प्रकरण

डावीकडून फरार आरोपी संपादक बाळ बोठे आणि रेखा जरे

नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला सायंकाळी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात अनुमाने २ मासांपासून मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे पसार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्यासमोर या अर्जावर १ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी झाली. त्यामध्ये बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आता पोलिसांना शरण येणे किंवा सर्वोच्च न्यायायात धाव घेणे हे २ पर्याय आरोपीसमोर असू शकतात.

आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद आहे. त्याच्या विरोधात पोलिसांकडेही भक्कम पुरावे आहेत. गुन्हा घडल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला.