हिंदूंमध्ये अभिनव पद्धतीने जनजागृती करणारे जखीणवाडी (जिल्हा सातारा) येथील धर्मप्रेमी श्री. शुभम पाटील !

लहानपणापासूनच धर्मकार्य करण्याची विशेष आवड असणारे धर्मप्रेमी युवक श्री. शुभम पाटील हे विविध माध्यमांतून हिंदु युवकांचे संघटन आणि प्रबोधन करत आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडले आहेत.

मुलुंड (मुंबई) येथील कोकण महोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंसह विविध मान्यवरांची भेट !

मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे मुलुंड सेवा संघ महिला बचतगट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करण्याची मागणी !

शहरातील धार्मिक स्थळे आणि तालमी यांच्यावरील मिळकत कर माफ करावा, अशी मागणी शहरातील धार्मिक स्थळांमधील कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे निवेदन देऊन केली.

मुंबई महापालिकेच्या अभियंत्यावर गुन्हा नोंद !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! सरकारी अधिकारीच भ्रष्ट असतील, तर राज्य कधीतरी भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

१५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍याला पकडले !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! पोलीसच लाच घेत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य कसे येणार ?

कुर्ला (मुंबई) येथील महिलेवर ३ धर्मांधांकडून बलात्कार !

अशा वासनांधांचा चौरंगा करण्याची शिक्षा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यच हवे !

गोरेगाव (मुंबई) येथे बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्‍याला अटक !

बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्‍या टोळीतील एका आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. गोरेगाव परिसरातील नागरी सुविधा केंद्रावर धाड टाकून पोलिसांनी ३० हून अधिक बनावट आधारकार्ड आणि १५ बनावट पॅनकार्ड जप्त केले आहेत.

उरुळी देवाची आणि फुरसुंगी (जिल्हा पुणे) या २ गावांची स्वतंत्र नगर परिषद होणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही २ गावे वगळण्यात येतील, तसेच या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगर परिषद करावी, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुढील १५ दिवसांमध्ये या संदर्भातील आदेश निघणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सातारा येथील वाढीव घरपट्टी प्रक्रियेला स्थगिती !

नुकत्याच झालेल्या चतुर्थ वार्षिक पहाणीनंतर घरपट्टी वाढीच्या नोटिसा वाटप करण्याची प्रक्रिया नगरपालिकेच्या वतीने जवळपास पूर्ण होत आली आहे. प्रक्रिया अपील प्रविष्ट करण्याच्या टप्प्यात असतांना ती तातडीने स्थगित करण्याचे निर्देश स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दूरभाषद्वारे दिले आहेत.

राज्यात पुणे जिल्ह्यात लंपीमुळे होणारे मृत्यू सर्वांत अल्प !

लंपी आजार नियंत्रणात येण्यासाठी पुणे जिल्ह्यात तत्परतेने लसीकरणावर भर दिल्यामुळे पशूंचे मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर अल्प झाला. पुणे जिल्ह्यात ६३३, तर बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४ सहस्र ५१० पशूंचा मृत्यू झाला आहे.