१५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍याला पकडले !

बीड – विनयभंगाच्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांना ५ डिसेंबर या दिवशी संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणात तक्रारदार व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे. संबंधित गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड आणि अंमलदार विकास यमगर या दोघांनी तक्रारदाराकडे ३० सहस्र रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ सहस्र रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यातील १० सहस्र रुपये तक्रारदाराकडून यापूर्वीच आरोपींनी घेतलेले होते, तर उर्वरित १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

संपादकीय भूमिका 

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! पोलीसच लाच घेत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य कसे येणार ?