कुर्ला (मुंबई) येथील महिलेवर ३ धर्मांधांकडून बलात्कार !

गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिले

(प्रतिकात्मक चित्र)

कुर्ला – येथे रहाणार्‍या ४२ वर्षीय महिलेवर ३ धर्मांधांनी तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यांनी तिच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटकेही दिले. यामुळे ती गंभीररित्या घायाळ झाली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर महंमद याकूब सिद्दिकी उपाख्य बबलू, वसीम, मुन्ना यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींपैकी महंमद याकूब सिद्दिकी उपाख्य बबलू याला पोलिसांनी पकडले. अन्यांचा शोध चालू आहे. तिन्ही धर्मांधांनी बलात्काराचे चित्रण करून ‘हा व्हिडिओ प्रसारित करू’, अशी धमकीही दिली होती.

संपादकीय भूमिका 

अशा वासनांधांचा चौरंगा करण्याची शिक्षा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यच हवे !