हिंदूंमध्ये अभिनव पद्धतीने जनजागृती करणारे जखीणवाडी (जिल्हा सातारा) येथील धर्मप्रेमी श्री. शुभम पाटील !

श्री. शुभम पाटील

कराड (जिल्हा सातारा) – लहानपणापासूनच धर्मकार्य करण्याची विशेष आवड असणारे जखीणवाडी (तालुका कराड) येथील धर्मप्रेमी युवक श्री. शुभम पाटील हे विविध माध्यमांतून हिंदु युवकांचे संघटन आणि प्रबोधन करत आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडले आहेत.

काहीच दिवसांपूर्वी जखीणवाडी येथे समितीचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ‘हलाल जिहाद’ या विषयावर युवकांना मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्री. शुभम यांनी केले होते. या मार्गदर्शनामधून प्रेरणा घेऊन श्री. शुभम यांनी ‘हलाल जिहाद’ ग्रंथ खरेदी करून मित्रांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट दिले. या माध्यमातून युवकांमध्ये ‘हलाल जिहाद’विषयी जागृती केली. या अभिनव उपक्रमाविषयी मित्रांनीही त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

मध्यभागी श्री. अविनाश येडगे (पिवळसर सदरा घातलेले) यांना ग्रंथ भेट देतांना श्री. शुभम पाटील (काळ्या रंगाचा सदरा आणि राखाडी रंगाचा पायजमा घातलेले) आणि उपस्थित युवक
श्री. राजेश चव्हाण ( डावीकडून तिसरे भगवा सदरा घातलेल्या युवकाच्या उजव्या बाजूस) यांना ग्रंथ भेट देतांना श्री. शुभम पाटील (काळ्या रंगाचा सदरा आणि राखाडी रंगाचा पायजमा घातलेले) आणि उपस्थित युवक

श्री. शुभम यांचे मित्र श्री. प्रमोद डिसले म्हणाले, ‘‘माझ्या वाढदिवसानिमित्त मला केक भेट मिळण्याऐवजी ‘हलाल जिहाद’ ग्रंथ मिळाला. आजपर्यंत कुणीही असे धाडस दाखवले नाही. हे एक धर्मकार्यच आहे. या ग्रंथाचा मी निश्चितपणे अभ्यास करून आचरण करीन.’’