देशात पुन्हा मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक होण्याची शक्यता ! – केंद्रशासन

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोना अजून संपलेला नाही; पण भारत प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सिद्ध आहे. आम्ही सर्व संबंधितांना सतर्क रहाण्यास आणि दक्षता वाढवण्यास सांगितले आहे.

हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी धर्माचरण आवश्यक ! – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

दिग्रस येथील श्री. मल्लिकार्जुन मंदिर सभागृह येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी पेण येथे २५ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी पद, पक्ष, संघटना, संप्रदाय, जात-पात हे सर्व बाजूला सारून आता धर्मरक्षणासाठी एक हिंदू म्हणून या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग जोतिबा डोंगर परिसरात पार पडला !

‘अवघ्या समाजाला सकारात्मक दिशा निश्चितपणे नारी शक्ती देईल’, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ संघटक श्री. शंकर गायकर यांनी या वेळी व्यक्त केला.

हडपसर (पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी घेतली हिंदुत्वनिष्ठांची भेट !

आज भारतात हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांवर अनेक आक्रमणे होत आहेत. यावर उपाय म्हणजे हिंदूंना जागृत आणि संघटित करणे !

हुतात्मा उद्यानाकडे सातारा नगरपालिकेचे दुर्लक्ष !

उद्यानाकडे दुर्लक्ष करणारे असंवेदनशील प्रशासन ! असे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? उद्यानाकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा करायला हवी, तरच पुन्हा अशा चुका होणार नाहीत !

लाच स्वीकारणार्‍या ग्रामसेवकाला पकडले !

तळागाळापर्यंत पोचलेल्या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर शिक्षापद्धतीच अवलंबायला हवी !

हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी  ‘सनबर्न’ महोत्सवाला दिलेली मान्यता रहित करा !

गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये.

‘कोरोना’च्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृती दल गठीत ! – देवेंद्र फडणवीस

कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर राज्यशासन लक्ष ठेवून आहे. चीनसह अन्य काही देशांत या रोगाचे रुग्ण पुन्हा आढळत आहेत; म्हणून राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारसमवेत समन्वय ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सांगितले.

आम्ही क्लब चालवतो, डान्स बार नव्हे : सतावणूक बंद करा ! – कळंगुट (गोवा) येथील क्लबचे चालक

राज्यात अवैध व्यवहार फोफावत असल्याने  त्याविरोधात जनता, व्यावसायिक, प्रशासन आणि सरकार यांनी राज्यहितासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे !