‘आय.पी.एल.’च्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणार्‍या १२ जणांविरोधात पुणे येथे गुन्हा नोंद ! १० जणांना अटक, २ जण पसार !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – ‘आय.पी.एल.’च्या ‘गुजरात टायटन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब’ या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावून नागरिकांकडून पैशांची देवाण-घेवाण करणार्‍या १२ जणांवर वाकड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यातील १० आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५८ सहस्र रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ते बनावट बँक (अधिकोष) खाते उघडून क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे घेत होते, याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली.