राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्यात सध्या काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी  पावसाचा अंदाज असून ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली येथे काही भागांत गारपीट अन् वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यांतील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वार्‍यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांतही राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. वाशिम जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पाऊस झाला. तालुक्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला.