पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून शोभायात्रेद्वारे नववर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत !

पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून आणि शोभायात्रेद्वारे नववर्षाचे नागरिकांनी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय शहरातील छोट्या आणि मोठ्या मंदिरांत फुलांची आरास करण्यात आली होती. नागरिकांनी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती.

पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये २ विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’ !

विद्यार्थिनींची छळवणूक करणार्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच काढून टाकायला हवे ! तसेच त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे !

अमरावती जिल्ह्यात अवेळी पावसामुळे ५५ सहस्रांहून अधिक हेक्टरची हानी !

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत अवकाळी पावसाने सलग चौथ्या दिवशी उपस्थिती लावली आहे. भर उन्हाळ्यात सलग कोसळणारा अवेळी पाऊस आणि गारपिटी यांनी अक्षरक्ष: शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पुणे येथील ‘ससून’मध्ये मृत रुग्णाच्या शरिरावर उंदराच्या चाव्याच्या खुणा असल्याचे समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट !

अतीदक्षता विभागात उंदीर फिरतात, हे रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण !

मिरज येथे गुढीवापाडव्यानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा पार पडली !

‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सापडले ५० हून अधिक भ्रमणभाष !

कळंबा कारागृहात भ्रमणभाष सापडल्यावरून प्रशासनावर कडक कारवाई होईल का ?

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या पक्षात किती किंमत आहे, हे माहीत आहे ! – धर्मराव बाबा आत्राम, मंत्री

वडेट्टीवार आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी १० दिवस देहली येथे बसून होते; मात्र ते उमेदवारी मिळवू शकले नाही, असे प्रतिपादन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

‘लव्ह जिहाद’च्या घटनेच्या मुळाशी असा काही प्रकार नसल्याचा पुणे विद्यापीठ प्रशासनाचा दावा !

‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून विद्यापिठात मुसलमान विद्यार्थ्यावर आक्रमण केल्याचे प्रकरण !

आंब्याची निर्यात चालू !

अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.

छत्रपती संभाजीनगर येथे जेवणातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होणे पोलिसांसाठी लज्जास्पद !