माघी गणेशोत्सवासाठी नियमावली घोषित !

माघी गणेशोत्सवामध्ये राज्य सरकारने ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. सरकारने माघी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. त्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.

कायद्याने पसंतीचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ! – मुंबई उच्च न्यायालय

कल्याण येथील खडकपाडा परिसरातील एका १९ वर्षीय मुसलमान मुलीने तिच्या आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता हिंदु युवकाशी पळून जाऊन विवाह केला. या प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका प्रविष्ट केली.

शहरी नक्षलवादी विल्सन यांची निर्दोष मुक्त करण्याची याचिका

देशद्रोही शहरी नक्षलवाद्यांना अमेरिकेतूनही अशा प्रकारचे साहाय्य मिळत आहे, असाच याचा दुसरा अर्थ होतो !

राज्यात ४५ लाखांहून अधिक न्यायालयीन खटले प्रलंबित !

एखादा खटला ३५ ते ४० वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?

धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत कार्यकर्त्यांचा गोंधळ !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात ९ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘परिवार संवाद’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील आले होते. त्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार करतांना छायाचित्र काढण्यासाठी रेटारेटी केल्याने गोंधळ झाला.

देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार !

देवगड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये ४ कर्मचार्‍यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या रकमेमधून त्यांनी मोठे बंगले बांधले असून गावाकडे स्थावर संपत्ती विकत घेतली आहे.

आंगणेवाडीवासियांच्या आरोग्य तपासणीसाठी २ मार्चपासून ४ आरोग्यपथके कार्यरत असणार

यात्रेनिमित्त गावात येणार्‍या आंगणे कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यासाठी २ मार्चपासून गावात ४ आरोग्यपथके कार्यरत असतील, अशी माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली आहे.

शेअर्सच्या व्यवहारात ७०० हून अधिक जणांना ३० कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍यावर गुन्हा नोंद !

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय याने अनेक लोकांना गंडा घातला.

खासदार राऊत यांचा अवमान झाला असून माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करा ! – शिवसेना

शिवसेना सचिव खासदार विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध अवमानकारक आणि प्रक्षोभक विधान करून त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली आहे.

मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी रसीद यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून तलवारी घेऊन नाच !

समाजात दहशत पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !