मुख्य आरोपी इरफान शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात कारावासाची शिक्षा झाली होती !

उमेश कोल्हे हत्येतील मुख्य सूत्रधाराचा ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात समावेश

उमेश कोल्हे आणि इरफान शेख

अमरावती – येथील उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी इरफान शेख आणि त्याचे ३ साथीदार यांनी एका हिंदु महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मध्यप्रदेशमधील इंदूर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्या वेळी न्यायालयाने इरफान याला १९ दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

पीडित महिलेला इरफान आणि त्याच्या मित्राने पळवून आणून तिला बळजोरीने बुरखा घालून घरी डांबून ठेवले. तिच्यावर बलात्कार केला, अशी पीडित महिलेने ऑगस्ट २०२१ मध्ये इंदूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी इरफान आणि त्याचे ३ साथीदार यांच्यावर गुन्हे नोंदवले होते. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबांनी ‘लव्ह जिहाद’चा आरोप केला होता.

इरफान शेख हाच उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार !

उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार इरफान शेख असून तो ‘रहबर’ नावाची एक सामाजिक संस्था चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता, असे पोलीस अन्वेषणातून समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

  • स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
  • यावरून धर्मांधांचे खरे स्वरूप उघड होते, हे हिंदूंनी वेळीच लक्षात घ्यावे !