गोवा : मये येथे २२ ते २८ मार्च गोमातेवरील शास्त्रीय ज्ञानावर आधारित संवादात्मक कार्यक्रम

या अनोख्या; पण उपयुक्त अशा व्याख्यानमालेसाठी नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक, पर्यटन व्यावसायिक, महिला बचत गट इत्यादी सर्वांनी सिकेरी गोशाळेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गोमंतक गोसेवक महासंघाने केले आहे.

गोवा : कुळे ते वास्को रेल्वे दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची वाट मोकळी

या प्रकल्पाला विरोध करतांना नागरिकांनी एकूण २६ आक्षेप नोंदवले होते. यातील १० आक्षेप थेट फेटाळण्यात आले, तर उर्वरीत १० आक्षेप फेटाळण्यापूर्वी सुनावणी घेण्यात येऊन ‘हे आक्षेप सक्षम प्राधिकरणाच्या कक्षेत नाहीत’, असे कारण देण्यात आले.

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

दुर्दैव म्हणजे काही आमदारदेखील गोव्यात सुरक्षित पर्यटन देण्याचा विचार न करता त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी दलालांना आश्रय देत आहेत. असे करून हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी गोव्याच्या पर्यटन उद्योगाला उद्ध्वस्त  करत आहेत.

गोव्यात संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याची  क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याला संरक्षणक्षेत्राला पुरवठा करण्याचे केंद्र बनण्याची चांगली संधी आहे. गोव्यात आधीच वेर्णा येथे जहाजबांधणीसाठी कोकण सागरी क्लस्टर आहे, ज्यामुळे ३ सहस्र रोजगार निर्माण होतील.

मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची ४ वर्षांची यशस्वी वाटचाल ! – प्रदेश भाजप

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याला भारतातील सर्वांत विकसित राज्य होण्यासाठी आवश्यक बळ आणि धैर्य त्यांना लाभो, हीच सदिच्छा !

शीख परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

शीख पंथीय गुरु गोविंदसिंग यांच्या परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांनी १६ मार्च या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे अनुयायी श्री. कुलदीप सिंग आणि त्यांची पत्नी सौ. किरण सिंग आदीही होते.

गोवा : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव विधवा भेदभाव प्रथा बंद करण्यावर खासगी ठराव मांडणार

हा ठराव मांडण्यापूर्वी युरी आलेमाव यांनी हिंदु धर्मशास्त्र जाणून घ्यावे, ही अपेक्षा ! हिंदु प्रथा-परंपरात हस्तक्षेप करणारे युरी आलेमांव मुसलमानांच्या हिजाब घालणे, बुरखा घालणे आदी प्रथांविषयीही आवाज उठवतील का ?

वन आणि पर्यावरण यांच्या हानीच्या सर्वेक्षणाला आरंभ !

यासंबंधी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सरकारला सुपुर्द करण्यात येणार आहे. या अहवालात हानीचे सर्वेक्षण करण्यासह वनक्षेत्र पुन्हा बहरण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी माहिती दिली जाणार आहे.

हणजूण (गोवा) येथे पर्यटकाला मारहाण : कामुर्ली येथील दोघांना अटक

अशा घटना गोव्याची जगभरात अपकीर्ती करतात. यातून समाजाला साधना शिकवणे किती अपरिहार्य आहे, ते लक्षात येते !

राष्ट्रीय वन आग प्रतिबंध आणि व्यवस्थापन आराखड्यामध्ये गोव्याच्या समावेशासाठी प्रयत्न करणार ! – वनमंत्री विश्वजित राणे, गोवा

या आराखड्यामध्ये गोव्याचे नाव समाविष्ट झाल्यास आगीच्या घटनेच्या वेळी आम्हाला साहाय्य करण्यासाठी आणखी काही यंत्रणांना बोलावता येईल.