गोवा : ४ वर्षांत विधानसभेचे कामकाज प्रतिवर्षी सरासरी १५ दिवसच झाले !

लोकशाहीमध्ये सकारात्मक चर्चा करून लोकांच्या समस्या सोडवायच्या असतात; मात्र अधिवेशनाचा कालावधी घटवल्याने अधिवेशन बोलावण्याचा उद्देशच नष्ट होत आहे.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांकडून भ्रमणभाष संच कह्यात !

पहारा आणि अनेक तपासण्या असतांना कारागृहात या वस्तू कशा जातात ? कामचुकारपणा केल्याच्या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !

राष्ट्रीय जलमार्गामुळे पणजी ते वास्को अंतर २० मिनिटांत कापता येणार !

पणजी ते वास्को हे अंतर ३२ किलोमीटर असून ते पार करण्यासाठी ४५ मिनिटे लागत. रस्ता वाहतुकीवरील ताण न्यून करण्यासाठी सरकार जलमार्गाचा अधिक वापर करण्यावर भर देत आहे.

गोव्यात २४ घंट्यांत आगीसंबंधी ७९ घटना

राज्यात नोंद झालेल्या एकूण ७९ घटनांपैकी ७० घटना या गवत किंवा बागायती यांना आग लागण्यासंबंधी होत्या, तर उर्वरित ९ घटना या अन्य स्वरूपाच्या होत्या.

गोव्यातील पाकधार्जिण्यांवर कारवाई करा !

गोव्यातील पाकिस्तानधार्जिण्या मुसलमानांवर कारवाई करण्याची मागणी म्हापसा येथील हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली.

राज्यातील सर्व क्षेत्रांना वर्ष २०५० पर्यंत १०० टक्के अक्षय्य ऊर्जा उपलब्ध करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोवा सरकारने वीज, वाहतूक, मासेमारी, कृषी, उद्योग आणि इतर क्षेत्र यांसाठी ‘ऊर्जा कृती योजना’ आखली आहे. संबंधित क्षेत्रांची उपयुक्त माहिती गोळा करून, तसेच तज्ञांकडे विचारविमर्ष करून ही योजना आखण्यात आली आहे.

गोवा : अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांचा केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वारंवार तक्रार करूनही अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष होणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता आहे कि त्यांचे अवैध कृत्य करणार्‍यांशी साटेलोटे आहे ?

‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ परिसरात फादरकडून होणार्‍या अवैध कृत्यांविषयी ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र रक्षा समिती’ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जोसेफ वाझ यांच्याकडून या वारसास्थळाच्या संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर फादर हे स्थान चर्चच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे.

गोवा : रायन फर्नांडिस याची १४ वर्षांनंतर होणार कारागृहातून सुटका

रायन फर्नांडिस याने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. रायन फर्नांडिस याची पूर्वसुटका केल्यास त्याचे कुटुंब त्याला स्वीकारण्यास सिद्ध असल्याचे पोलिसांनी सर्वाेच्च न्यायालयाला सांगितल्यावर त्या आधारे २ मार्च या दिवशी हा निवाडा देण्यात आला आहे.

पाण्याचे देयक एकरकमी भरण्यासाठी १६ मार्चपर्यंत मुदतवाढ !

यापुढे प्रलंबित देयके भरण्यासाठी पुन्हा एकरकमी योजना काढली जाणार नाही आणि पाण्याचे देयक २ मास न भरल्यास तिसर्‍या मासाला संबंधित ग्राहकाची पाण्याची जोडणी तोडण्यात येणार आहे.