‘२४ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मला सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. आश्रमात जाण्यापूर्वी
‘रामनाथी आश्रमात जायचे आहे’, हा निरोप मला मिळाला आणि माझ्या मनात एकही नकारात्मक विचार आला नाही. खरेतर माझी शारीरिक स्थिती आश्रमात जाण्यासारखी नाही; पण ‘देवच माझी काळजी घेणार आहे आणि देवच मला आश्रमात सुखरूप पोचवणार आहे’, असे विचार माझ्या मनात येत होते.
२. आश्रमात गेल्यानंतर
२ अ. आश्रमातील महाप्रसाद घेतांना ‘चैतन्य ग्रहण करत आहे’, असे वाटणे : माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे घरी असतांना कित्येक दिवस मला अन्न व्यवस्थित ग्रहण करता येत नव्हते. जेवणापूर्वी मला मळमळायचे, तसेच भूक असतांनाही जेवणाची इच्छा व्हायची नाही; परंतु आश्रमात महाप्रसाद ग्रहण करतांना मला जेवण व्यवस्थित जात होते. महाप्रसाद ग्रहण करतांना माझ्याकडून अन्नपूर्णामातेला प्रार्थना झाल्याने ‘मी चैतन्यच ग्रहण करत आहे’, असे मला वाटत असे.
२ आ. ध्यानमंदिरात नामजप करतांना ‘चैतन्य ग्रहण करत असून पूर्ण शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे वाटणे : आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना प्रथम मला थोडे मळमळल्यासारखे झाले आणि माझे डोके दुखू लागले; परंतु दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून नामजप केल्यावर माझा नामजप भावपूर्ण होऊन मला हलके वाटू लागले. ‘आपण पुष्कळ चैतन्य ग्रहण करत आहोत आणि ते चैतन्य आपल्या पूर्ण शरिरात जाऊन एकदम प्रसन्न वाटत आहे’, असे मला जाणवले. मला हलकेपणाही जाणवत होता.’
– श्रीमती हिराबाई अहिरे (वय ७२ वर्षे), भोर, पुणे. (२४.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |