अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण, प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे !


पाथर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – जवखेडे खालसा येथील कानोबा उपाख्य कानिफनाथ देवस्थानाच्या इनामी जागेत शेख गणीभाई, शेख अब्बास सरदार बाबा आणि शेख जमादार यांनी अनधिकृत ‘हॉटेल सावन’ उभारले, तसेच आताही त्या भागात अनधिकृत बांधकाम चालू केले आहे. १४ जानेवारी या दिवशी स्थानिक अमोल वाघ आणि ग्रामस्थ यांनी महसूल, पोलीस अन् ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देऊन बांधकाम हटवण्याची मागणी केली होती; परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे ग्रामस्थांनी ४ मार्चपासून तहसील कार्यालय, पाथर्डी येथे आमरण उपोषण चालू केले. (प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे ग्रामस्थांना उपोषण करण्यास भाग पडणे लज्जास्पद ! लँड जिहादच्या विरोधात संघटित होऊन लढा देणार्या ग्रामस्थांची कृती अभिनंदनीय आहे ! – संपादक)
Land J!had by Fanatics on Inam Land of Kanifnath Devasthan in Javkhede Khalsa (Ahilyanagar)!
Villagers go on an indefinite hunger strike to remove encroachments; strike withdrawn after written assurance from the administration!
Why does such a hunger strike have to be… pic.twitter.com/BbyX4BOnjh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 12, 2025

उपोषणाच्या तिसर्या दिवशी, म्हणजेच ६ मार्चला तहसीलदारांनी याची नोंद घेत स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकार्यांना अनधिकृत बांधकाम करणार्यांना नोटीस काढण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायतीच्या नोटिसीनुसार संबंधितांनी ३० दिवसांत लेखी खुलासा द्यावा किंवा स्वतःहून बांधकाम हटवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

संपादकीय भूमिकाअसे उपोषण का करावे लागते ? अनधिकृत हॉटेल आणि बांधकाम होत असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे. |