सर्वपक्षीय महिलांकडून अश्लील कृत्य करणार्‍या गौरव आहुजा याचा निषेध !

पुणे – जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या सर्वपक्षीय महिलांनी येरवडा येथे रस्त्यावर अश्लील कृत्य करणार्‍या गौरव आहुजा याचा निषेध व्यक्त केला. अशा विकृत गुन्हेगारांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. गौरव आहुजा याने भर रस्त्यात सिग्नलला गाडी थांबवून लघुशंका आणि अश्लील कृत्य केले. स्वारगेट बलात्कार प्रकरण आणि त्यापाठोपाठ हे प्रकरण यांमुळे महिला संतप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे आहुजाचा निषेध केला. ‘पोलिसांचा वचक अल्प झाला, कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळेच असे प्रकार वाढत आहेत’, अशी टीका करण्यात आली.