श्री देव खाप्रेश्वर मंदिर समितीने पर्यायी स्थळाच्या प्रस्तावाला नकार दिला

वेताळदेवाच्या कौलप्रसादानुसार मंदिराचे मूळ स्थानच योग्य

पणजी, ८ मार्च (वार्ता.) – श्री देव खाप्रेश्वर देवस्थान समितीने मंदिराचे पुनर्निर्माण मूळ जागेवरच करावे, असा आग्रह धरला आहे. सरकारने सुचवलेल्या पर्यायी स्थळाच्या प्रस्तावाला समितीने स्पष्ट नकार दिला आहे. श्री देव खाप्रेश्वर देवस्थान समितीने मुळगाव येथील श्री वेताळ देवाचा कौलप्रसाद घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. देवाच्या कौलप्रसादानुसार मंदिराची मूळ स्थळाची निवडच योग्य आहे आणि त्यावर ते ठाम आहेत. ‘श्री देव खाप्रेश्वर मंदिरासाठी स्थानिकांनी जागा निश्चित केल्यानंतर देवाचा कौल घेतला जाणार आहे आणि त्यानुसार जागा निश्चित केली जाणार आहे’, असे विधान ३-४ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सावंत यांनी केले होते.