पुण्यातील नागरिकांना मीटरने पाणी मिळणार ! – महापालिका आयुक्त

पुणे – शहरातील नागरिकांना एकसारखे आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी चालू केलेल्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०२६ पासून पुण्यातील नागरिकांना मीटरने पाण्याचे देयक देण्यास प्रारंभ होईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले. पुढील १० वर्षे समान पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेने निधीही उपलब्ध करून दिला आहे. या योजनेसाठी २ सहस्र ४८ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यापैकी १ सहस्र ४७१ कोटी रुपये खर्च झाला आहे. उर्वरित सर्व कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील काही भागांमध्ये पाण्यासाठी मीटर बसवण्याचे काम चालू आहे. १४१ पाणीपुरवठा झोनपैकी ६२ झोनचे काम पूर्ण झाले आहे. ज्या भागांमध्ये पाण्याची गळती होत आहे, ते शोधण्यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. रोबो यंत्राच्या सहाय्याने जलवाहिनीची पडताळणी करून गळती, बेकायदा नळजोड शोधण्याचे प्रात्यक्षिक महापालिकेने घेतले आहे, असे महापालिका आयुक्त भोसले यांनी सांगीतले.

शहरातील ज्या नागरिकांना मीटरने पाणी दिले जाते, त्यांच्याकडून जानेवारी २०२५ पर्यंत १०२ कोटी रुपये जमा झाले आहेत, तर ७२७ कोटी ९६ लाख रुपयांची