जागतिक महिला दिनानिमित्त !

मुंबई – महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी कार्यवाही करून बालविवाह होऊ नयेत, यासाठी लोकचळवळ राबवणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या, ‘‘विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि नागरिक यांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा. विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून बालविवाह, जाचक विधवा प्रथा, अन्यायकारक अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, तसेच मुलींच्या जन्मदर वाढीसाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे.