महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना अटक करा

मविआच्या आमदारांनी निदर्शने करत केली मागणी !

विधीमंडळाच्या पायर्‍यांवर जोरदार निदर्शने करतांना महाविकास आघाडीचे आमदार

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात ५ मार्चला महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर जोरदार निदर्शने केली. त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली, तसेच सरकार अशा लोकांना संरक्षण देत आहे, याविषयी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.