मुंबई – आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने ८ मार्चला महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च अशा २ महिन्यांचा हप्ता दिला जाणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली. त्यामुळे योजनेतील महिलांना ८ मार्च या दिवशी ३ सहस्र रुपये मिळतील.