इस्लाम आणि ख्रिस्ती यांचे अनुयायी त्यांच्या महत्त्वपूर्ण मान्यतेनुसार जगातील लोकांची मोमीन (विश्वास ठेवणारे) आणि काफिर (विश्वास न ठेवणारे अन्य धर्मीय) या २ भागांत विभागणी करतात. विश्वास असणारे सर्व जण स्वर्गात जातील आणि बाकीचे नरकात, म्हणजेच त्यांना सुख किंवा मोक्ष मिळू शकत नाही.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्भवेत् ।।
अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो !
१. पंथांचे चुकीचे विचार
‘प्राण्यांमध्ये चांगली भावना असावी, जगाचे कल्याण होवो’, अशा घोषणा त्यांच्या धर्म दर्शनाच्या विरुद्ध आहेत. भारतीय दर्शनानुसार ‘विश्वे अमृतस्य पुत्राः ।’ (श्वेताश्वरोपनिषद्, अध्याय २, वाक्य ५) म्हणजे ‘विश्वातील अमृताचे पुत्र’, म्हणजे आपण सर्व जण सर्वशक्तीमान परमात्म्याचे पुत्र आहोत. आपण आणि परमात्मा यांच्यामध्ये इतर कुणीही नाही; परंतु पंथावर श्रद्धा असणारे म्हणतात, ‘महंमद अल्लाचे दूत आहेत. ईसा मसीह ईश्वराचे पुत्र (दूत) आहेत.’ त्यांच्यावर विश्वास असणारे म्हणतात, ‘अल्ला एक आहे, ईश्वर (गॉड) एक आहे; परंतु ते ७ व्या स्वर्गलोकात रहातात. ते खाली येऊ शकत नाहीत. त्यांना मनुष्याच्या पातळीवर आणणे किंवा मानणे हे पाप आहे.’ एक हिंदु धर्माभिमानी त्याचे नाव ओमप्रकाश, सत्यनारायण, ईश्वरचंद्र, हरिओम्, सत्यप्रकाश (अशी देवतांची नावे) ठेवतो; कारण तो ईश्वराचा पुत्र आहे, त्याच्या अंत:करणात स्वत: परमात्म्याचा निवास आहे. ‘आत्मा म्हणजेच परमात्मा !’
पंथीय लोक असे म्हणत नाहीत; म्हणून त्यांचे नाव ‘अल्ला’ किंवा ‘गॉड’ ठेवले जात नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘असे करणे’, हे घोर पाप आहे. ही ईश्वराची निंदा असून त्यासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची व्यवस्था आहे. अल्ला किंवा गॉड प्रत्येक प्राणीमात्रात नसल्याने त्याला मारणे, ही सामान्य घटना आहे. ‘जे काफीर आहेत, विश्वास नसणारे आहेत, त्यांच्या मानण्यात पालट करणे’, हे मोमीनांचे (विश्वास असणार्यांचे) कर्तव्य आहे; परंतु जर समोरची व्यक्ती ‘ते मान्य करत नसेल, तर त्याचा वध करणे’, हे पुण्याचे काम आहे आणि मारणार्या व्यक्तीला ‘गाझी’ या पदवीने सन्मानित केले जाते. पंथ अशा सिद्धांतावर आधारलेला आहे.
१ अ. पंथामध्ये नकाराला मान्यता नाही ! : श्रीमद्भगवत गीतेच्या १६ व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘कर्तव्य-अकर्तव्य’, याविषयीचा संशय नष्ट करण्याच्या हेतूने उपदेश केलेला आहे. सर्व काही समजावल्यानंतर शेवटी (अध्याय १८, श्लोक ६३) श्रीकृष्ण म्हणतात, ‘विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ६३), म्हणजे ‘या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर.’ याचाच अर्थ ‘मी माझ्या संपूर्ण विवेकाने धर्माचे कार्य तुला समजावले आहे. आता सर्व सूत्रांचा नीट विचार करून स्वत:चा निर्णय घे आणि त्यानुसार कर्म कर.’
ख्रिस्ती पंथातील खोट्या, तर्क नसणार्या, अवैज्ञानिक मान्यता यांवर ख्रिस्ती विचारक मार्टिन ल्यूथर किंग यांनी प्रहार केला. त्यामुळे मुक्त चिंतन, विचारविनिमय करणे चालू झाले. पाश्चिमात्य देशात (येशूचे अनुयायी) व्यवहारिक जीवनात वैज्ञानिक मान्यता स्वीकारल्या गेल्या. त्यामुळे ते आज विज्ञान क्षेत्र जगाचे नेतृत्व करत आहेत. दुसरीकडे मुसलमान अजूनही कुराणाखेरीज इतर कोणत्याही विचारांना मान्यता देत नाहीत. कुराणाचे विवरण करणे, ही ईश्वराची निंदा असून त्यासाठी मृत्यूदंड ही एकमेव शिक्षा आहे. इस्लामच्या निरनिराळ्या उपपंथांमध्ये परस्पर वैचारिक मतभेद असल्याने रक्तरंजित संघर्ष होत आहेत. खोट्या मान्यतांमध्ये अडकलेले इस्लामी देश सर्वाधिक प्रमाणात आतंकवादाने त्रासलेले आहेत. इस्लामी देशांच्या सरकारांना त्यांच्या देशात ‘कायदा-व्यवस्था राखणे’, हे एक अवघड आव्हान झाले आहे.
२. कथित धर्मनिरपेक्षता
सामान्यत: धर्म हा कर्तव्याचा पर्याय आहे. असे म्हटले जाते, ‘धर्मेण हीना पशुभिः समानाः ।’, म्हणजे ‘धर्मविहीन (धर्माचरण न करणारी) माणसे ही पशूंसारखीच आहेत.’ याचाच अर्थ धर्माखेरीज व्यक्ती ही सामाजिक नसून पशूप्रमाणे असते. भारतात स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारण्यांनी राज्यघटनेतील ‘पंथनिरपेक्ष’ या शब्दाचा धोक्याने धर्मनिरपेक्षपणाच्या रूपात प्रसार करून त्याच्या आडून सनातन धर्माचा विरोध करायला आरंभ केला. आपले ऋषिमुनी यांच्याकडून मिळालेला अनमोल ठेवा, म्हणजे वेद, उपनिषद, गीता, रामायण यांना सांप्रदायिक ग्रंथ असल्याचे घोषित करून त्यांना सार्वजनिक शिक्षणपद्धतीतून बाहेर केले आहे. दुसरीकडे अल्पसंख्यांक म्हणून विशेष अधिकार प्राप्त झालेले पंथीय लोकांना त्यांच्या कालबाह्य आणि तर्कविरहीत गोष्टींना सिद्धांताच्या रूपात मदरशातून शिकवण्यासाठी सरकारकडून अनुदान प्राप्त झाले आहे.
– डॉ. श्रीलाल, संपादक
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’)