मुंबई – मुंबई पोलिसांनी काळाचौकी येथून ५, गोवंडी येथून ४ आणि साकीनाका येथून १, अशा १० बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यांच्याकडे बनावट कागदपत्रांच्या आधारे सिद्ध केलेले भारतीय नागरिकत्वाचे पुरावे आढळले. ते जप्त करण्यात आले आहे. काळाचौकी येथून महंमद सलाम सरदार उपाख्य अबू सलाम, सोहाग सफीकुल सरदार उपाख्य महंमद सोहाग सफीकुल इस्लाम, महंमद शमीम मुराद हसन अली उपाख्य समीम मुल्ला, महंमद अलामिन लतीफ मोरोल आणि आशुरा खातून यांना अटक करण्यात आली. गोवंडी आणि साकीनाका येथून हुसेन मोफिजल शेख, लिटोन मोफिजल शेख, अन्सार अली सरदार, सुलेमान रहीम शेख अन् शाहिदा मुल्ला उपाख्य माही चौधरी यांना अटक करण्यात आली. त्या सर्वांनी भारत-बांगलादेश सीमेवरून अनधिकृतपणे भारतात प्रवेश केला आणि तेथून ते मुंबईत आले.
संपादकीय भूमिकाअटकेनंतर अशा घुसखोरांवर काय कारवाई झाली ?, तेही नागरिकांना समजायला हवे ! आतापर्यंत सापडलेल्या सर्व घुसखोरांना त्यांच्या देशात हाकलून लावायला हवे ! |