खलाशी सुखरूप

अलिबाग – येथील समुद्रातच २८ फेब्रुवारीला पहाटे ३ ते ४ च्या सुमारास मासेमारांच्या नौकेला आग लागली. या आगीत नौका ८० टक्के जळली. या नौकेवर १८ ते २० खलाशी होते. त्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि स्थानिक मासेकार यांना यश आले. साखर आक्षी गावातील राकेश मारुति गण यांच्या मालकीची ही नौका होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांच्या साहाय्याने नौका किनार्यावर आणण्यात आली.