Christians Surround Bishop  Francis : चर्चचा हिशोब न देणार्‍या पाद्रयावर लोक संतप्त !

  • चर्चमधील भ्रष्टाचार !

  • बिशप फ्रान्सिस यांना घेराव !

चर्चमध्ये ख्रिस्त्यांमध्ये हाणामारी

दावणगेरे (कर्नाटक) – कर्नाटकच्या दावणगेरे जिल्ह्यातील हरिहर येथील एका चर्चमध्ये ख्रिस्त्यांमध्ये हाणामारी झाली. चर्चच्या पाद्रयाने हिशेब न दिल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. चर्चमध्ये काही ख्रिस्त्यांनी चर्च करत असलेल्या कामकाजाचा हिशोब मागितला होता. चर्चचे पाद्री के.जे. जॉर्ज यांनी हिशोब देण्यास टाळाटाळ केली. (हिंदूंच्या मंदिरात भक्तांमध्ये असा असा वाद झाल्यास सरकार मंदिर कह्यात घेते; परंतु चर्चमध्ये मोठे आर्थिक घोटाळे घडूनही सरकारने चर्च कह्यात घेतल्याचे ऐकिवात नाही. हिंदू या भेदभावाविषयी सरकारला जाब कधी विचारणार ? – संपादक)

त्यामुळे ख्रिस्त्यांनी चर्चच्या आवारातच वाद घालून हाणामारी चालू केली. पाद्रयाकडे अनेकदा विनंती करूनही त्यांनी हिशोब दिला नाही, असा आरोप करत ख्रिस्त्यांनी बिशप (वरिष्ठ पाद्री) फ्रान्सिस यांना घेराव घातला.