
नंदुरबार – येथे केवळ ५ मिनिटांत बनावट कागदपत्रे सिद्ध करून मिळत आहेत. येथील तळोदा आणि धडगाव या शहरांत १०० रुपयांमध्ये जातीचा, तसेच उत्पन्नाचा दाखला बनवून दिला जात आहे. सायबर कॅफेच्या माध्यमातून हा प्रकार केला जात आहे. अशा प्रकारच्या बनावट कागदपत्रांमुळे विद्यार्थ्यांची हानी होत आहे. ‘अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्र बनवणार्यांवर कठोर कारवाई होईल’, असे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट झाला असतांना प्रशासनाच्या ते लक्षात कसे आले नाही ? प्रशासन इतके निष्क्रीय कसे ? |