मुंबईतील दुकानाच्‍या व्‍यवस्‍थापकाकडून गुजराती किंवा हिंदी बोलण्‍याची बळजोरी

ठाकरे गटाने खडसावल्‍यावर माफी मागितली !

मुंबई – येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील रुपम शोरूम या दुकानाच्‍या व्‍यवस्‍थापकाने मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदी या भाषांमध्‍ये बोलण्‍याची बळजोरी केली. ‘मीपण मराठीत बोलणार नाही’, असेही त्‍याने सांगितले. तरुणाने ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्‍याकडे याची तक्रार केली. संतोष शिंदे यांनी घटनास्‍थळी येथे व्‍यवस्‍थापकाला खडसावले आणि त्‍याला मराठी बोलायला लावले. मराठीतून माफीही मागायला लावली. हा सर्व प्रकार ध्‍वनीमुद्रित करण्‍यात आला असून त्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

संपादकीय भूमिका :

मराठीला अभिजात (उच्‍च) भाषेचा दर्जा मिळूनही तिची अशी गळचेपी महाराष्‍ट्रात केली जाणे लज्‍जास्‍पद ! मराठीप्रेमींनीच आता याविरोधात संघटित व्‍हायला हवे !