नवी मुंबई – लव्ह जिहाद, धर्मांतर, हलाल जिहाद, ‘वक्फ बोर्ड’चा लँड जिहाद, गोहत्या अशा विविध मार्गांतून देश, हिंदु धर्म आणि हिंदु बांधवांवर आघात अन् अन्याय होत आहेत. हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यावर होणार्या या अनेक आघातांना वाचा फोडण्यासाठी, हिंदु राष्ट्र स्थापनेची मागणी करण्यासाठी, तसेच हिंदूंच्या व्यापक संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, करावे गाव, सीवूड्स येथे ९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करावे गाव, सीवूड्स भागातील विविध भागांत बैठका, व्याख्याने, हस्तपत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्स फलक या माध्यमांतून प्रसार केला आहे. तसेच सामाजिक माध्यमांतूनही मोठ्या प्रमाणात या सभेचा प्रसार करण्यात आला असून लोकांचा चांगला प्रतिसाद याला लाभत आहे. या सभेला मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन लाभेल. सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी पद, पक्ष, संघटना, संप्रदाय, जात-पात हे सर्व बाजूला सारून आता राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी एक ‘हिंदु’ म्हणून या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८०८०२०८९५८ या क्रमांकावर संपर्क करावा, असे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.