प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मागणी

नवी देहली – देशात केवळ गोमांसच नाही, तर मांसाहारी पदार्थांवरही बंदी घातली पाहिजे. सरकारांनी अनेक ठिकाणी गोमांसावर बंदी घातली आहे; परंतु अनेक ठिकाणी ते अजूनही कायदेशीर आहे. ईशान्येकडील लोक ते उघडपणे खाऊ शकतात; पण उत्तर भारतात नाही, असे विधान प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. या वेळी त्यांनी समान नागरी कायद्याचे कौतुक केले.
समान नागरी कायद्याविषयी खासदार सिन्हा म्हणाले की, जे नियम उत्तर भारतात लागू केले जाऊ शकतात, ते ईशान्येकडील राज्यांमध्ये लागू केले जाऊ शकत नाहीत. तसेच समान नागरी कायद्यामध्ये अनेक बारकावे आणि पळवाटा आहेत. या कायद्यातील तरतुदींचे प्रारूप सिद्ध करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे.