अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे औरंगजेबी फुत्कार !

मुंबई – समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असलेल्या ‘छावा’ चित्रपटातील धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येचे चित्रण पाहून अनेक प्रेक्षकांचे डोळे पाणावत आहेत. हिंदूंच्या राजाच्या अशा क्रूर हत्येविषयी संवेदना तर सोडा; उलट ‘५०० वर्षापूर्वीच्या घटनेने भावूक होणारा समाज मनाने आणि आत्म्याने मेलेला आहे’, असे औरंगजेबी फुत्कार अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी ‘एक्स’ खात्यावरून काढले आहेत. स्वरा भास्कर यांच्या हिंदुद्वेषी वक्तव्यावरून ‘एक्स’ खात्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे.
‘छावा’ चित्रपटात दाखवण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील अत्याचाराचे चित्रण आणि महाकुंभपर्वांतील चेंगराचेंगरी याचा काडीमात्र संबंध नसतांना हिंदुद्वेष व्यक्त करतांना स्वरा भास्कर यांनी या दोन्ही घटनांचा संबंध लावून हिंदूंच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी असलेल्या भावनांचा अनादर केला आहे.
एक्सवरील संदेशात स्वरा भास्कर यांनी गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले. त्यांचे मृतदेह बुलडोझरद्वारे काढावे लागले. यावर चिंता न व्यक्त करता समाज ५०० वर्षांपूर्वीच्या चित्रणाने भावूक होत असेल, तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेला आहे’, असे लिखाण केले आहे.
यावर वाचकांनी ‘औरंगजेब की बेटी अभी तक जिंदा है’, ‘तुम्हे क्या फर्क पडता है, बेटा तो सनातन ने खोया है’, अशा प्रकारे चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संपादकीय भूमिकाज्या हिंदी चित्रपटसृष्टीने समाजात हिंदुद्वेष आणि हिंदु धर्माविषयी तुच्छता निर्माण केली तीच हिंदी चित्रपटसृष्टी आता मुसलमानांची पोल खोल करत असल्याचे त्यांना कसे बघवेल ? |