२ धर्मांधांसह अन्यांवर गुन्हा नोंद !
जळगाव – येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणार्या २ टँकरवर पोलिसांनी कारवाई करत ते जप्त केले. पोलिसांनी संशयास्पदरित्या जाणारे २ टँकर थांबवले. चालकांची चौकशी केल्यावर दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणली. दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण २७ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी चालक सद्दाम सय्यद अकबर (वय २३ वर्षे), लतीफभाई फकीर महंमद हिंगोरजा (वय २४ वर्षे), टँकरमालक ज्ञानेश्वर शेजोळे (वय २१ वर्षे) आणि सुलेमान इलियास छेरेया यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.