राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; २५ फेब्रुवारी पुढील सुनावणी !

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – गेल्या ४ वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आणि ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर २८ जानेवारीला अंतिम सुनावणी होण्याची शक्यता होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नवा दिनांक दिली असून पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.

न्यायालयाने निवडणुकांना स्थगिती दिली नाही; पण ओबीसी आरक्षणाचे सूत्र रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याविषयी निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यातच न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात काही जणांनी न्यायालयात धाव घेतली. ओबीसी आरक्षण असो कि नसो; पण निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.