बसभाडेवाढीची कल्पना नव्हती ! – परिवहनमंत्र्यांचे घुमजाव

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे भाडे वाढणार आहे, याची कल्पना नव्हती, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. मी परिवहनमंत्री असेपर्यंत भाडेतत्त्वावर बस घेणार नाही. स्वमालकीच्या ५ सहस्र बसगाड्या घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे, असेही त्यांनी या वेळी म्हटले.

याविषयी अधिकारी आणि मंत्री यांच्यात समन्वय नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी या वेळी दिले. २७ जानेवारी या दिवशी अर्थमंत्री अजित पवार आणि प्रताप सरनाईक यांच्यात बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.

परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढीविषयी घोषित केले. पत्रकारांनी संपर्क केल्यावर त्याविषयी समजल्याचे परिवहन मंत्र्यांनी या वेळी सांगितले. तरीही ‘या निर्णयाचे दायित्व मी घेतो’, असेही ते म्हणाले.

या वेळी भाडेवाढीचे समर्थन करून ते म्हणाले की, टायर, पेट्रोल यांचे दर वाढत आहेत. संस्था चालवणेही आवश्यक आहे.