प्रयागराज (उत्तरप्रदेश), १५ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठेचा तिथीनुसार पहिला वर्धापनदिन ११ जानेवारी या दिवशी साजरा झाला. त्याच दिवशी प्रयागराज येथील महाकुंभपर्वात सेक्टर १९ मधील मोरी मुक्ती मार्ग चौक येथे लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे श्री रामलल्लाच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या दिवशीच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा योग जुळून आला. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक उपस्थित होते.