ICU In Mahakumbha : महाकुंभपर्वात १३२ रुग्णांवर अतीदक्षता विभागात उपचार    


प्रयागराज – येथील त्रिवेणी संगमावर स्नानासाठी आलेल्या १० सहस्रांहून अधिक नागरिकांना पहाटेच्या थंडीचा कडाका सहन झाला नाही. यांतील १३२ रुग्णांना अतीदक्षता विभागात हालवण्यात आले आहे. रुग्णांवर महाकुंभपर्वासाठी उभारण्यात आलेले केंद्रीय चिकित्सालय आणि जवळच्या स्वरूपराणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचार चालू आहेत. प्रयागराजमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अती थंड वातावरण सहन न झाल्याने त्यांना जीव गमवावा लागल्याचे सांगितले जात आहे. तथापि हे ४ जण महाकुंभपर्वासाठी आले होते का ?, याची निश्‍चिती होऊ शकली नाही.